मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील शिवाजी हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी रुचिरा संदेश झोपे हिने एन एम एम एस (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा )सन 2022 23 मध्ये ओबीसी प्रवर्गातून जिल्ह्यातून 80 व्या मेरिटने सुयश मिळवले आहे . असून तिला या यशाने दरवर्षी शिक्षणासाठी 12 हजार रुपये शासनातर्फे शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येणार आहे .
या परीक्षेसाठी शिवाजी हायस्कूल मधून ३३ विद्यार्थी बसलेले होते . त्यापैकी नऊ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे . रुचिरा संदेश झोपे .ही या लाभास पात्र झाली आहे .
रुचिरा निमखेडी येथील रहिवासी असून या यशाबद्दल तिचे शिवाजी हायस्कूलचे संचालक मंडळ , मुख्याध्यापक , शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच निमखेडी येथील नागरीकांनी अभिनंदन केले आहे .