Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचा . राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा आरोप .


आज महाराष्ट्रभर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका सुरू असून यामध्ये सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप  विधान परिषदेचे गटनेते आ. एकनाथराव खडसे यांनी केला आहे . आमदार खडसे यांनी सांगितले की या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार आहेत . कारण शेतकरी राजा आमच्या पाठीशी उभा आहे .
 कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक ही विधानसभेच्या निवडणुकी सारखी समजली जाते कारण विधानसभेच्या निवडणुकीचे भवितव्य या दृष्टिकोनातून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे . या निवडणुकीमध्ये भुसावळ मध्ये पोलीसच मतदाराला मतदान केंद्रापर्यंत नेत असल्याचे एका वृत्तवाहिनीने दाखवले असून सदरचा प्रकार हा सत्तेच्या गैरवापर आहे यावर आळा बसणे जरुरी आहे . सध्या महाराष्ट्रात खोक्यांचे राजकारण सुरु आहे . तरी पण बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महा विकास आघाडीतर्फे आम्ही लढवत असून याचा शंभर टक्के यश आम्हाला मिळेलच . त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर सुद्धा महाविकासच्या आघाडीचे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उमेदवार अधिक निवडून येणार आहेत . असेही एकनाथराव खडसे यांनी सांगितले आहे . यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक  राजेंद्र चौधरी ,सुधाकर जावळे ,  उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.