रत्नागिरी जिल्ह्यातील महाराष्ट्र भर गाजत असलेल्या बारसु प्रकल्प प्रकरणी आंदोलकांच्या भेटीस जाणाऱ्या शिवसेनेचे ठाकरे खासदार विनायक राऊत यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे .
प्रकल्प बाबत आंदोलन नियोजना संदर्भात आंदोलकांना भेटण्यासाठी ते जात होते . प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले असले तरी बारसु प्रकल्प हा परिसराच्या हिताचा नसल्याचे तेथील नागरिकांच्या म्हणणे असून , या रिफायनरीच्या परिसरातील जमिनी या परप्रांतीयांनी विकत घेतल्या आहेत . त्यामुळे या ठिकाणी परप्रांतीय लोकांचा बोलबाला राहणार असून स्थानिक लोकांना यापासून काही फायदा नसून रिफायनरी मुळे प्रदूषण वाढू शकते अशी या लोकांचे म्हणणे आहे .तसेच सताधारी शिंदे फडणवीस सरकारने या प्रकल्पासाठी स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता हा प्रकल्प येथे आणलेला असल्याचे बोलले जात आहे .खासदार राजू शेट्टी व शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत हे आंदोलनाचा नेतृत्व करणार होते आणि आंदोलन तीव्र करण्याच्या तयारीत होते म्हणून प्रशासनातर्फे त्यांना ताब्यात घेण्यात सांगण्यात आले आहे . परंतु महाराष्ट्रभर आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होत असून ठाकरे गटाच्या खासदारांना अटक होणे हे राजकारणाचा भाग म्हणून बोलले जात असुन ठाकरे गटाच्या शिवसेनेत याबाबत तीव्र असंतोष आहे .