जळगाव जिल्ह्यातील जागृत असे हनुमंताचे स्थान असलेले बोदवड तालुक्यातील मुक्ताईनगर रोडवर शिरसाळा मारूती हे पुरातन देवस्थान आहे . या देवस्थानाचा विकास जोमाने असून या ठिकाणी भरपूर विकास पूर्ण झालेली आहे .
पंधरा ते वीस वर्षांपूर्वी या ठिकाणी केवळ एक लिंबाच्या झाडाखाली हनुमंताची मूर्ती होती . कोण तेही बांधकाम या ठिकाणी नव्हते तरी सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रभरातून भाविक हनुमंताच्या दर्शनाला येत होते .सदर दैवत जागृत असल्याने अनेकांना यांच्या अनुभूती आल्या . त्या प्रमाणे भाविकांची गर्दी वाढत गेली व देणग्या सुद्धा यायला लागल्याने त्या ठिकाणी बांधकामे सुरू झाले . आज या ठिकाणी मंदिराचे बांधकाम विविध हॉल व भरपूर विकास कामे झाले असून भाविकांसाठी सुविधा उपलब्ध होते .महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातून सुद्धा या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत असतात .
दर शनिवार, शनि अमावस्या व हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी या ठिकाणी मोठे कार्यक्रम होत असतात लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात व त्यांच्या मनोकामना पूर्ण होत असतात . परंतु या ठिकाणी बजरंग बली मूर्तीच्या डोक्यावर छत बांधू देत नाही असे या ठिकाणी भक्त मंडळी सांगतात . या ठिकाणी धनगर नावाचे पुजारी हनुमंत रायाची मनोभावे सेवा करत असतात व मंदिराचे संस्था चालक सुद्धा या मंदिराचे विकास कामाकडे पूर्ण लक्ष देत असतात . उदया असलेल्या हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाची पूर्ण तयारी झाली आहे . गुरुवारी आ .चंद्रकात पाटील पायी दिंडी घेवुन शिरसाळा येथे दर्शना साठी येणार आहेत .