Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


अपंग व्यक्तींना 35 किलो धान्य मिळावे दक्षता समितीच्या सविता माळी यांच्या मागणी


 वरणगावसह परिसरात अपंग व्यक्तींना आनंदाचा शिधा तसेच रेशनचे धान्य योग्य पद्धतीने मिळाले नसल्याची तक्रार महीला दक्षता समितीच्या सदस्या व अपंग साधना संघांच्या  सविता सखाराम माळी यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी जळगांव यांच्याकडे केली आहे . 
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की वरणगावातील प्रधान ,नन्नवरे , वंजारी ,चौधरी ,आदीच्या स्वस्त धान्य दुकानात मशीन 20 /20 किलो धान्य अपंगासाठी दाखवत असून केवळ पाच /पाच किलो धान्य पुरवठा विभागाकडून देण्यात आले असल्याचे  दुकानदारांचे म्हणणे .आहे .तसेच अपंगांना शासनाकडून मिळणारा आनंदाचा शिधा सुद्धा देण्यात आला नाही .हा अन्याय अपंगावर का होत आहे . असा सवाल त्यांनी केला आहे . अपंगांच्या नावांची यादी ऑनलाईन शासनाकडे एक वर्षापूर्वीच सुपूर्द केली असून अद्याप पर्यंत त्यांच्यावर अन्याय होत आहे .तरी हा अन्याय पुरवठा अधिकाऱ्यांनी दूर करावा . व प्रत्येकी ३५ किलो धान्य मिळावे अशी मागणी आहे . मागणी पूर्ण न झाल्यास  आंदोलन करण्याचा इशारा  सविता माळी यांनी दिलाआहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.