ज्ञानाचे महासागर भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वरणगाव नगर परिषद तर्फे पुस्तक पहिला सुरुवात करण्यात आली आहे
आजची तरुण पिढी वाचन सोडून मोबाईलवर इंटरनेट पाण्याच्या आहारी गेल्याने वाचनाकडे दुर्लक्ष केले आहे
वाचनात भर पडली की जीवन बदलते जीवन बदलले की आचार विचार बदलतात हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत या उपक्रमाची सुरुवात केली आहे .
यासाठी रावेर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी वरणगाव नगर परिषद च्या वाचनालयाला पुस्तकांची भेट देत प्रतिसाद दिला आहे
वरणगाव नगरपरिषद चे मुख्याधिकारी यांनी सांगितले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे शिका आणि संघटित व्हा ही शिकवण जोपासली पाहिजे . मोबाईलचा उपयोग मनोरंजन साठी चांगला आहे मात्र त्यातील घटना विश्वास पात्र असतीलच असे नाही . मात्र पुस्तकातील माहिती व ज्ञान हे अचूक असते आज तरुण पिढीसाठी पुस्तक वाचन हे महत्त्वाचे वाटत असल्याचे सांगून नगरपरिषद उभारलेल्या भव्य वाचनालयात जाऊन त्यातील स्पर्धात्मक व इतर सामान्य ज्ञानाचे पुस्तकाचे वाचनासाठी उपयोग करावा यासाठी शहरातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन या पुस्तक पिढीला पुस्तके भेट देऊन सहकार्य करावे
नागरिकांनी वाढदिवस व इतर आना काही खर्च न करता या पुस्तक पिढीला मदत करावी व मुलांच्या शैक्षणिक भविष्यासाठी हातभार लावावा असे आव्हान वरणगाव नगर परिषद चे मुख्य अधिकारी समीर शेख यांनी आवाहन केले आहे