दरवाज्याला कडी न लावल्याने चोरट्याने ही संधी साधली आहे .नरसिंग काकडीया वसावे, वय 25 ' गुमळ पिंपळखुटा ,अक्कलकुवा हल्ली मुक्काम साकेगाव हे प्रमोद सोनवणे यांच्या मालकीच्या घरात भाडेकरू म्हणून वास्तव्यास आहेत . शिवाय त्यांच्यासोबत अन्य तरुण शिक्षणानिमित्त भाडेतत्त्वावर राहतात . बुधवार रात्री वसावे यांना झोप लागल्यानंतर त्यांना दरवाज्याची कडी लावण्याचा विसर पडल्याने चोरट्यांनी घरात प्रवेश करीत 42 हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल व 18 हजार रुपये किमतीचे लॅपटॉप लांबविले आहे . सकाळी झोपेतून उठल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार नोंदविली आहे . तपास हवालदार वाल्मीक सोनवणे करीत आहे .
साकेगांव येथील भाडेकरी युवकाचे मोबाईल व लॅप टॉप लांबविले . गुन्हा दाखल
April 15, 2023
0
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे भाडे तत्वावर राहत असलेल्या भाडेकरू तरुणांच्या घरातून चोरट्यांनी मध्यरात्री पाच मोबाईल व लॅपटॉप लांबविला हा प्रकार बुधवार 12 एप्रिलला मध्यरात्रीच्या सुमारास घडला आहे . या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .