Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ येथे थोर सक्षम फाउंडेशन व जयहिंद गृप तर्फे नामावली पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन





समाज संघटन शक्ती हीच समाजाचा विकास करू शकते . असे प्रतिपादन आ. संजय सावकारे यांनी भुसावळ येथे केले .ते भुसावळ येथील लोणारी समाज मंगल कार्यालयात थोर सक्षम फाउंडेशन संचलित थोर लेवा पाटील  व जय हिंद ग्रुप भुसावळ तर्फे आयोजित भव्य नामावली पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या प्रकाशन प्रसंगी  बोलत होते .
   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोलते फाउंडेशनचे अध्यक्ष निशिकांत कोलते हे होते . तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी , माजी नगरसेवक पिंटू कोठारी, शिवसेनेचे दीपक धांडे ,सामाजिक कार्यकर्ते सतिष सपकाळे , सर्वोदय मंडळ अध्यक्ष चंद्रकांत चौधरी , उल्हास चौधरी ,थोर पंचायत समिती अध्यक्ष दिनेश पाटील ,परशुराम चौधरी, दिनकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व स्वागत गीताने  करण्यात आली . याप्रसंगी मान्यवरांचा तसेच पुस्तक नामावली मध्ये जाहिरात देणारे व पुस्तक तयार करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला . 
भुसावळ शहरातीत थोर लेवा समाज बांधवांची सविस्तर पारिवारिक माहिती चे पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले .
     या प्रसंगी आ . संजय भाऊ सावकारे यांनी सांगितले की थोर लेवा समाज रूढी व परंपरा पाळून विकास करणारा आहे . जागा मिळाली तर समाजासाठी हॉल तयार करायचा असल्यास मी तो करून देईल . तसेच समाजात संघटन शक्ती मोठी असून प्रकाशित झालेले नामावली या  प्रकारचे पुस्तक मी पहिल्यांदाच बघत आहे .
     याप्रसंगी चंद्रकांत चौधरी यांनी गावागावातील पाणी प्रश्न , प्रकल्पग्रस्तांचा नोकरीचा विषय आपल्या मनोगतात मांडला .अध्यक्षीय भाषणात निशिकांत कोलते यांनी समाजाच्या विकासासाठी समाजातील प्रत्येकाने तन , मन , धन पद्धतीने मदत करण्याचे आवाहन केले .
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक परशुराम चौधरी यांनी मांडले . सुत्रसंचालन युवराज कुरकुरे सर व एम के पाटील सर यांनी केले . तर आभार चेतन चौधरी यांनी मानले . 
कार्यक्रम यशस्वीतेसाठी थोर पंचायत समिती , जयहिंद गृप व थोर सक्षम फाउंडेशनचे मनोज कुरकुरे ,चंद्रशेखर चौधरी , योगेश रोटे , संजय चौधरी ,प्रशांत पाटील , किरण चौधरी , प्रकाश चौधरी ,शरद पाटील ,तुषार कुरकुरे , संदीप पाटील ,मिलिंद पाटील ,चंदन पाटील , प्रवीण महाजन ,जितेंद्र चौधरी , अतुल पाटील ,लालचंद चौधरी ,सुभाष चौधरी , डिगंबर पाटील , हितेश पाटील ,प्रमोद लोणे , विजय चौधरी आदींनी परिश्रम घेतले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.