Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेचा वरणगांव येथे मेळावा संपन्न



      बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीसाठी वरणगाव येथे रविवारी  नागेश्वर मंदिरात च्या प्रांगणात भाजप शिवसेना युतीतर्फे निवडणूक प्रचारार्थ मेळावा घेण्यात आला . .याप्रसंगी आमदार श्री चंद्रकांतभाऊ पाटिल, आमदार संजय भाऊ सावकारे, .श्री.अशोकभाऊ कांडेलकर, मा.श्री. नंदुभाऊ महाजन उपस्थित होते 
    शेतकरी परिवर्तन पॅनलचा हा मेळावा आयोजित केलेला होता .
         यावेळी माजी नगराध्यक्ष सुनिल काळे , शेख अखालाख, अतुल झांबरे , सुनिल माळी ,प्रशांत पाटील , राजेंद्र चौधरी व सोसायटी संचालक, उप संचालक, सरपंच, उपसरपंच , ग्रा पं सदस्य, पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित होते .
 सोसायटी मतदारसंघातील उमेदवार वसंतराव एकनाथ राव राणे एन टी मधून श्री अनिल प्रभाकर  वंजारी . हे या परिसरातील उमेदवार जाहीर झाले आहेत .
याप्रसंगी आमदार संजय सावकार यांनी सांगितले की शिवसेना भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या विकासासाठी वचनबद्ध आहे शेतीमालाला भाव देणे शेतकऱ्यांसाठी बीज उपलब्ध करून देणे यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प सुद्धा राबविण्यात येणार आहे विरोधकांना फक्त अडथळे आणण्याचे काम येथे असे सांगितले तरी शेतकऱ्यांनी कोणत्याही बोल सापांना बळी न पडता शेतकरी पॅनलच्या पूर्ण उमेदवारांना मतदान करावे अशा आव्हान यावेळी केले .
तसेच मुक्ताईनगर आमदार पाटील यांनी सांगितले की शेतकरी हा केंद्रबिंदू मानून सरकार शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना अंमला आणत आहेत .त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे हे आमचे आद्य कर्तव्य असून शेतकऱ्यांनी आपले मतदान शेतकरी पॅनलला देऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायापालट करावा व विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्यावी .या पॅनलला छत्री म्हणून निशाणी मिळाली असून सध्या उन व पाऊस असं निसर्गाद्वारे आपणास दिसत असून आपल्याला छत्रीची गरज असल्याचे निसर्ग सुद्धा सांगत आहे तरी आपल्या पॅनलच्या पूर्ण १८ उमेदवारांना मतदान करावे .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल काळे यांनी केले तर आभार गजानन वंजारी यांनी मानले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.