Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


महामार्गावरील फुलगाव लुंबिनीनगर रस्त्याच्या कामासह टोल नाक्याजवळील रस्ता तात्काळ दुरूस्त करा . अनथा शिवसेना ( उबाठा ) रस्ता रोको करणार


- शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी "नही'च्या व्यवस्थापकाना दिला रास्ता रोकोचा इशारा

वरणगाव - फुलगावच्या लुंबिनीनगर जवळील रस्ता आणि गटारीचे काम महामार्ग झाल्यापासून रखडले आहे. तसेच. फेकरी टोलनाका हटवल्यानंतर त्या ठिकाणी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर दगडांचा कस आणि वाळू पडली आहे. महामार्गाचे काम देखील या ठिकाणी अपूर्ण अवस्थेत आहे.  या समस्या तात्काळ सोडवा अन्यथा शिवसेना स्टाईलने महामार्गावर रास्ता रोको आंदोलन   करण्याचा इशारा शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख महाजन यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे व्यवस्थापकीय संचालक सिन्हा यांना निवेदनातून दिला आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जळगांव यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, फुलगाव येथील लुंबिनी नगर जवळील गटारी आणि रस्त्याचे काम महामार्ग झाल्यापासून रखडला आहे. वेळोवेळी लुंबिनी  नगरवासियानी आंदोलन व समज दिली होती. परंतु अद्यापपर्यत गटारी आणि रस्त्याचे काम झालेलं नाही. 

तसेच फेकरी टोल नाका काढल्यानंतर त्या ठिकाणीं महामार्गावर मोठ्या प्रमाणावर रेती, खडी, दगड पडलेले आहे. तसेच त्या भागातील महामार्गाचे काम देखील अपूर्णावस्थेत आहे. या ठिकाणीं दररोज लहान मोठे अपघात होत असता. एखाद्या वेळेस मोठा अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावर राहील. हा रस्ता तत्काळ दुरुस्त करावा तसेच फुलगाव येथील लुंबिनीनगर जवळील रखडलेल्या गटारी आणि रस्ताही तत्काळ दुरुस्ती करावा अन्यथा शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे फुलगाव उड्डाणपुलावर तसेच फेकरी टोलनाक्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात नमूद केले आहे. 

निवेदन देताना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर, वरणगाव शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी, युवा सेना जिल्हाआधिकारी चंद्रकांत शर्मा आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.