भुसावळ शहरात काल रात्री उशिरापर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह कायम असताना भुसावळ शहरालगत असलेल्या महामार्ग वरील साकरी उड्डान पुला जवळ शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी मोटरसायकलवर येऊन गोळीबार केला . यात अक्षय रतन सोनवणे , वय २६ व मंगेश अंबादास काळे वय २४ हे दोन युवक गंभीर जखमी झाले आहे . अक्षयच्या पोटाला गोळी लागली असून मंगेश डोक्याला जखमा झाल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे . दोन्ही जखमींवर जळगाव येथील गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहे .
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे व तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे आपल्या स्टाफसह घटनास्थळी पोहोचले होते . लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल असे वेळी पोलिसांनी सांगितले आहे . या घटनेने भुसावळ शहरात पुन्हा गुन्हेगारीने डोक्यावर काढले असे बोलले जात असून सदरची घटना पूर्व वैमनस्यातून घडली असल्याचे समजते .