Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वरणगाव शहरात पुन्हा पाणीटंचाई

वरणगाव शहरात पाणीटंचाईने पुन्हा डोके वर काढले

वरणगाव शहरात पुन्हा पाणी टंचाईने डोके वर काढले असून सध्या आठ ते नऊ दिवसापासून काही भागात पाणीपुरवठा झालेला नाही सध्या एप्रिल महिना सुरू आहे उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे तसेच मुस्लिम बांधवांचा रमजान पवित्र महिना सुरू असून याच काळात पाणीटंचाई दिसून येत आहे यापूर्वीसुद्धा वरणगाव शहरात 23 दिवस पाणीपुरवठा झालेला नव्हता प्रशासकीय काळात वरणगाव शहराला पाणीपुरवठ्याच्या समस्या निर्माण होतात याकडे नगरपरिषद प्रशासनाचे नेमके दुर्लक्ष होत आहे का? अशी जनसामान्यात चर्चा सुरू आहे हतनुर धरणातून वेळोवेळी पाणीपुरवठा सोडल्या जातो  कठोरा पंपिंग हाऊसवर पाणी उपलब्ध असताना वरणगावकरांना पाणी मिळत नाही याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे
वरणगाव शहरासाठी 25 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना सुरू होणे अपेक्षित होते मात्र पाणीपुरवठा ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे ही पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण होऊ शकली नाही या पाणीपुरवठा ठेकेदाराला मुदतवाढ दिली होती या पाणीपुरवठा ठेकेदाराने काही भागांमध्ये पाण्याच्या टाक्या सुद्धा बांधलेल्या नाही विकास कॉलनी मध्ये पाण्याची टाकी बांधण्यासाठी एक वर्षापासून मोठा खड्डा खोदून ठेवला आहे परंतु तिथे काही काम झालेले दिसत नाही तरी मुदतवाढ देऊन सुद्धा मुदतीत काम पूर्ण होईल की नाही याबद्दल नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे या पाणीपुरवठा ठेकेदाराला प्रशासकीय आशीर्वाद तर नाही ना? पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण व्हावी यासाठी  राजकीय पक्षांनी आंदोलन सुद्धा केले आहे पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण झाली असती तर आज वरणगावकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागले नसते याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.