तेलंगना राज्यांचा विकास करणारी भारत राष्ट्र समितीची महाराष्ट्रात घोडदौड सुरू . अनेक कार्यकर्त्यांनी घेतला प्रवेश
April 13, 2023
0
तेलंगणा राज्यात एक आदर्श मॉडेल तयार करून देशभरात शेतकरी,कष्टकरी,दिन-दलित,आर्थिक मागास वर्ग अशा सर्व घटकांचा विकास करत अवघ्या नऊ वर्षात तेलंगणा राज्याचा कायापालट केलेल्या के.चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाची महाराष्ट्रातील सुरु असलेली घोडदौड नाशिक जिल्ह्यात पोहचली असून महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष मा. माणिकराव कदम यांच्या उपस्थितीत व उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख नानासाहेब बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली हैद्राबाद येथे भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते डॉ. लक्ष्मण साबळे, भारत राष्ट्र समितीचे नाशिक जिल्हा समन्वयक श्री. सचिन कड, प्रा. मुकुंद आहेर, राम निकम, वैभव देशमुख, चंद्रकांत बच्छाव, सोमनाथ बोराडे, बिलाल शेख जळगाव जिल्ह्य़ातील मा.नितिन तायडे ,भिकनभाऊ सोनवणे ,अॅड.निलेश महाजन ,सोनु पाटील,लक्ष्मण सांगोरे यांच्या सह उत्तर महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला. सीएम. के.सी.आर यांनी डॉ. लक्ष्मण साबळे यांच्यासह कार्यकर्त्यांसोबत नाशिक जिल्हातील विविध समस्यांवर चर्चा केली. महाराष्ट्रात नैसर्गिक संसाधनांची मुबलक उपलब्धता असताना केवळ दिशाहीन राजकीय नेतृत्वामुळे महाराष्ट्रातील जनता त्रस्त आहे. अवघ्या 8/9 वर्षात तेलंगणा राज्य शेतकरी आत्महत्या मुक्त झाले आहे. अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्यामुळे तेलंगणाची जनता समाधानी असल्याचे सीएम के.सी.आर यांनी सांगितले.