31 मार्च 2023 रोजी कोळगावं ता. भडगाव विर जवान ( फौजी ) आयु. धनराज रमेश केदार हे आपल्या 17 वर्षाची देश सेवा करून रिटायर झालें,
त्यांचे आज कोळगावं येथे आगमन झालें असता, त्यांचे रिटायरमेंट निमित् स्वागत करण्यासाठी कोळगावं येथील जनसमुदाय, परिसरातील चाहते व देशसेवा करणाऱ्या सैनिक व सुटीवर घरी आलेले सैनिक, रिटायर झालेले सैनिक, शहीद जवानाच्या पत्नी असे मोठ्या संख्येने जनसमुदाय हजर होता. त्यांच्या स्वागतासाठी चाळीसगावं येथील जय हिंद सैनिक अकादमी चे संस्थापक, सचिव, सल्लागार हे आपल्या संस्थेची गाडी फुल्लांनी व तिरंगा ध्वजाने ने सजवलेली गाडीत फौजी धनराज केदार , त्यांची पत्नी, मुले यांना बसवून कोळगावं बस स्टॅन्ड पासून गावात डीजेच्या देशभक्तीपर गाण्यावर वाजत गाजत गावात मिरवणूक काढण्यात आली.
स्टेजवर भव्य सत्कार गावातील प्रतिष्ठित, त्यांचे मित्र परिवार , आजी, माजी सैनिक , जय हिंद सैनिक अकादमी चे संचालक यांनी केला आहे .