Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वरणगांव येथे मोदी सरकार विरोधात राष्ट्रवादी चे एप्रिल फुल आंदोलन . गॅस सिलेंडरला घातला हार .



वरणगाव येथे मोदी सरकारने केलेल्या भाववाढीच्या निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पेट्रोल पंपावर एप्रिल फुल आंदोलन करून गॅस सिलेंडरला हार घालण्यात आला आहे . 
याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र नाना पाटील , तसेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते वाय आर पाटील , समाधान चौधरी ,  दीपक मराठे , रवी सोनवणे , इम्तिकार मिर्जा आदी उपस्थित होते .

 यावेळी मोदी सरकार च्या विरोधात घोषणा देण्यात आल्या . याप्रसंगी वाय आर पाटील सर यांनी सांगितले की पेट्रोलचे भाव , गॅस सिलेंडरचे भाव तसेच सर्व जीवनावश्यक  वस्तूचे भाव भयंकर वाढले असून भाजपा सरकारने आपल्याला दिशाभूल केली आहे . त्यामुळे अश्या खोट्या आश्वासनाला बळी पडू नका . भान ठेवून भाजपाच्या कमळाला मतदान करू नये .
कमळाचे फूल एप्रिल फुल अशी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी ,कामगार ,शेतमजूर , सर्वच अडचणीत सापडले असून भारतीय जनता पक्षाने जनतेला वेठिस धरण्याचे कार्य केले आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.