Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


जळगाव येथे आदिवासी कोळी महासंघाचा विभागीय मेळावा व नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ संपन्न .


 

  जळगाव येथे आदिवासी कोळी महासंघाचा विभागीय मेळावा व नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ पार पडला  कोळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री :'डॉ.आदरणीय दशरथजी भांडे साहेब ,मा.प्रभाकर आप्पा सोनवणे गटनेते तथा राज्य उपाध्यक्ष आ.कोळी महासंघ यांचे प्रमुख उपस्थितीत आदिवासी कोळी समाजाचा सामाजिक ,शैक्षणिक ,आर्थिक,व  राजकीय विकास साधण्याच्या हेतूने ,युवकांना सामाजिक व्यासपीठावरून समाज प्रबोधनाची संधी मिळावी यास्तव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
 .यावेळी भुसावळ तालुकाध्यक्ष गणेश भाऊ कोळी यांनी दशरथजी भांडे साहेब यांना आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची सुंदर अशी मूर्ती भेट दिली . यावेळी त्यांचेसोबत संघटनेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी तथा सागर ठाकरे ;तालुका युवा अध्यक्ष ,महेश कोळी . महीला अध्यक्षा सीमा कोळी व सोशल मिडिया प्रभारी ,व सहकारी यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी  एकजूट होऊन सामाजिक विकास साधण्यासाठी समर्पित असल्याचे सांगितले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.