Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


फुलगाव येथे शांतता कायम राहण्यासाठी निष्पक्ष चौकशी त्वरीत व्हावी माजी सरपंच व सदस्यांचे निवेदन

 फुलगाव येथे माजी ग्रामपंचायत सदस्य श्याम फुलगावकर उपोषणाला बसले असून त्यांनी केलेल्या मागण्यांबाबत व आरोपाबाबत  नित्पक्षपणे चौकशी त्वरित करून फुलगावात शांतता कायम ठेवावी . असे निवेदन माजी सरपंच , उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिले आहे .
निवेदनात म्हटले आहे की शाम फुलगावकर हे राजकीय व्देशापोटी आरोप करीत असून आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार असून संविधानाला धरूनच आम्ही प्रशासकीय कामे केलेली आहे . त्यावेळेस मासिक सभेत कोणत्याही विषयावर तोंडी किंवा लेखी स्वरूपात आक्षेप नोंदवला गेला नसून नंतर गैर कारभार झाल्याचे आताच त्यांनी कसे काय सांगितले आहे  मुद्दा महत्त्वाचा आहे . सर्व सभांना उपस्थित राहून शाम याने निषेध नोंदवलेले नाही .सर्व विषय सर्वानुमते मंजूर झालेले होते . कोणत्याही मासिक विषयाला विरोध शाम फुलगावकर यांनी विरोध केलेला नव्हता .तरी याबाबत त्वरित चौकशी होऊन गावातील शांतता कायम राहावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे . निवेदनावर माजी सरपंच वैशाली हरी टाकोळे , माजी  उप सरपंच राजेंद्र पंढरीनाथ चौधरी , माजी सदस्य  हेमलता आशिष शिंदे ,गायत्री नरेंद्र चौधरी , प्रणिता रोशन चौधरी , दिनेश जगन्नाथ चौधरी ,निळकंठ एकनाथ चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत . तसेच निवेदनाच्या प्रती पालकमंत्री गुलाबराव पाटील , ग्राम विकास मंत्री गिरीश भाऊ महाजन ,आमदार संजय भाऊ सावकारे, मुख्याधिकारी जिल्हा परिषद जळगाव , जिल्हाधिकारी जळगाव , चौकशी अधिकारी , पोलीस निरीक्षक वरणगाव ,यांना पाठविण्यात आल्या आहेत .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.