जळगाव जिल्ह्यात दगडफेकीचे प्रकार सुरू असून एक एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील मुंजोबा यात्रेसाठी प्रसिध्द असलेल्या अट्रावल येथे दहा ते बारा जणांच्या टोळक्याने एका पुतळ्याची विटंबना केली .यावेळी असे करू नका हे सांगणार्या व्यक्तींवर दगडफेकीचा प्रकार करण्यात आला आहे .
सदर घटनेने गावात त्यांना तणावपूर्ण शांतता आहे . घटनास्थळी जिल्हा पोलीस उपअधिक्षक चंद्रकांत गवळी , यावल पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश मानेगावकर तसेच पोलीस स्टॉप ' रॅपिडक्शन फोर्स या ठिकाणी दाखल झाला असुन , सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे . गावात पोलीस पथसंचलन करण्यात आले असुन अफवा वर विश्वास ठेवु नये असे आवाहन पोलीसांनी केले आहे . शनिवारी सकाळी या टोळक्याला असे कृत्य करू नका असे ग्रामस्थांनी त्यांना सांगितले असता त्यांनी त्यांच्यावरील दगडफेक केली होती . सदर प्रकार निंदनीय आहे . पोलीस लवकरच अशा व्यक्तींना ताब्यात घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले . गावात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे पोलिसांचे संपूर्ण लक्ष आहे .