कृषी उत्पन्न बाजार समिती बोदवड ची निवडणूक लागली असून या निवडणुकीसाठी परिसरातील ग्रामपंचायत मधून सदस्यांची यादी मागविण्यात आली होती . त्यांना या निवडणुकीत मतदानाचा अधिकार असतो .
दिपनगरजवळील निंभोरा पिपरी सेकम ग्रामपंचायत मधील ग्रामविकास अधिकारी संजय भारंबे यांनी पंचायत समितीला ग्राम पंचायत च्या १७ सदस्याची यादी पाठवली होती . ही यादी पंचायत समिती मार्फत उपनिबंधक यांच्याकडे जात असते . कृषी उत्पन्न बाजार समिती मतदारांची यादी जाहीर झाल्यानंतर त्यातून ग्रामपंचायतचे सदस्य यासीनखा पठाण ,दिलीप बळीराम बरहाटे, शालिनी विजय सूर्यवंशी व कमल श्रीकांत भिरूड या पाच सदस्यांचे नावे वगळण्यात आले आहे . नावे कसे वगळण्यात आले आहे याबद्दल पंचायत समितीची संबंधितांनी संपर्क साधला असता ,आम्हाला यातील काहीच माहित नाही असे सांगण्यात आले . सदरचे सदस्य हे आमदार एकनाथराव खडसे व संतोष भाऊ चौधरी यांच्या जवळचे असून मुद्दामून सदर नावे वगळण्यात आले असावे असा अंदाज सदर सदस्यांनी वर्तवला आहे .याबाबत हे पाचही सदस्य उपनिबंधक यांना भेटणार असून त्यांनी निवेदन देणार आहे . निवेदनावच्या प्रती आमदार एकनाथराव खडसे , संतोष भाऊ चौधरी , सहायक निबंधक व निवडणूक अधिकारी यांना पाठवण्यात आले आहे . सदर सदस्यांना मतदाना पासुन वंचित ठेवु नये अशी मागणी होत आहे .