भुसावळ तालुक्यातील गावात एकाच दिवशी तीन विवाह होत असताना चाईल्ड लाईन व पोलिसांच्या चौकशीत दोन बालविवाह होणार असल्याचे आढळून आले हे दोन बालविवाह रोखण्यात यश आले आहे
मिळालेल्या माहितीनुसार चाईल्ड लाईन टीम सदस्यांनी बालकल्याण समितीच्या आदेशानुसार घटनास्थळी भेट दिली मुलीचे कागदपत्र तपासले असता ती अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर भुसावळ पोलिसांच्या मदतीने बालविवाह रोखण्यात आले आहे
तसेच गावातील विवाह होत असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे दुसऱ्या होणाऱ्या विवाह स्थळी भेट देऊन मुलीचे व मुलाचे वयाची पडताळणी केली त्यात अल्पवयीन असल्याचे आढळून आले तोही बालविवाह रोखण्यात आला तिसऱ्या विवाह स्थळी भेट दिली असता मुलगी मुलाचे पालक कागदपत्र घेऊन उपस्थित होते कागदपत्रे नुसार मुलगी व मुलगा वयात असल्याचे आढळून आले या बालविवाह रोखण्या कामी चाईल्ड लाईन समन्वयक येवलेकर टीम सदस्य कुणाल , निलेश चौधरी ,रंजना इंगळे प्रसन्ना बागल यांनी काम पाहिले आहे .