राज्य शासनाने एसटी प्रवासात महिलांना 50 टक्के सूट जाहीर केली त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे परिणामी खाजगी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांना प्रवासी मिळत नसल्याने त्यांचा उदरनिर्वाचा प्रश्न गंभीर झाला आहे
प्रवासात 50 टक्के सूट मिळत असल्याने भुसावळ येथून एसटीने प्रवास करणारा महिलांची गर्दी वाढू लागली आहे कधी नव्हे ती एसटीची बस गर्दीने खचून भरतांना दिसून येत आहे
मात्र प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यवसायावर मात्र परिणाम झाला आहे खाजगी वाहनाकडे प्रवाशांनी पाठ फिरवली त्यामुळे दिवसभरात मजुरी दूरच वाहनांचा इंधन खर्च देखील निघेल की नाही असा प्रश्न पडला आहे त्यातून काही व्यवसायिकांनी नोकरी नाही म्हणून रोजगारासाठी विविध प्रकारचे बँकेचे कर्ज घेऊन वाहने घेतली आहेत त्यांना वाहनाचा हप्ता भरावा लागतो पण व्यवसाय नसल्याने कर्जफेड कशी करावी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालायचा असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर आहे कारण दिवसभरात प्रवाशांच्या प्रतिक्षेत तास वाहने उभी असतात पण प्रवासी मिळत नाहीत त्यामुळे आर्थिक कोंडी झालेले वाहन चालक इतर व्यवसायाकडे वळण्याच्या मानसिकतेमध्ये आहे पण त्यासाठी पैशाची जुळवा जुळव कशी करायची हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे