Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


राजेश्री संघमित्रा महीला फाउंडेशन भुसावळ तर्फे स्त्री सन्मान कार्यक्रम संपन्न




 
   राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन भुसावळ तर्फे  *स्त्री शक्ती सन्मान सोहळा-२०२३* या उपक्रमाचे प्रथमतःहा आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रम दिनांक २४/३/२०२३वेळ दुपारी २:०० वाजता स्थळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह पंचायत समिती हाॅल भुसावळ येथे घेण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ,माता सावित्रीबाई फुले,माता रमाई या महानस्रीयांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फुलहार अर्पण करून द्वीप प्रज्वलित करण्यात आले.नंतर कार्यक्रमाची प्रस्तावना फाउंडेशन अध्यक्ष राजेश्री सुरवाडे यांनी केले दरम्यान फाउंडेशन च्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरणासाठी सातत्याने समाजहिताचे उपक्रम राबविले जातात त्यातच "स्री शक्ती पुरस्कार" महिलांच्या कलागुणांना वाव मिळावी व त्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी आपल्या भुसावळ शहरातील ११ महिलांची निवड केली असुन यापुढेही समाजातील विविध क्षेत्रातील तळागळातील महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रमात अध्यक्षस्थानी जळगाव जनता बँक शाखा भुसावळ व्यवस्थापक गजानन खोरखेडे सर असुन  प्रमुख पाहुणे  भुसावळ पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रेम परदेशी सर, जळगाव जनता बँक शाखा भुसावळ उपव्यवस्थापक अनिल खरे सर,कनिष्ठ सहाय्यक पंचायत समिती भुसावळ कविता नारखेडे मॅडम, पशुधन संवर्धन पंचायत समिती भुसावळ वैशाली ब-हाटे, ॲड.आलम मिर्झा सर असुन सुरवातीला ॲड.आलम मिर्झा यांनी कार्यक्रमात पुरस्कारार्थी महिलांना  त्यांचे कलेचा आज सन्मान असुन महिलांना आज पुरूषांच्या बरोबरीने समानतेचा अधिकार आहे  त्यांनी असेच काम करावे अश्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रेम परदेशी यांनी सर्व महिलांचे कौतुक करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या व फाउंडेशन च्या कार्याचे कौतुक करुन समाजात करत असलेल्या समाजहिताचे उपक्रमासाठी आम्ही पत्रकार बांधव नेहमी आपल्या सोबत आहे अशी भावना व्यक्त केली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जळगाव जनता बँक शाखा भुसावळ व्यवस्थापक गजानन खोरखेडे यांनी उपस्थित महिलांना बैंकेत महिलांना बचत गटाच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जातात जेणे करून महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल यासाठी आपण बैंकेत कर्ज काढून व्यवसायसाठी लाभ मिळवु शकता याबाबत सांगितले व फाउंडेशन च्या कार्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. यामध्ये विविध क्षेत्रातील तळागळातील महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले विशेषता यामध्ये सामाजिक क्षेत्र,महिला सबलीकरण सह पार्लर व्यवसाय, शिवणकाम, रांगोळी,मेहंदी, हलव्याचे दागिने तयार करणे,देवाची मुर्ती सजावट करणे, खाद्यपदार्थ तयार करून विक्री .ई क्षेत्रात स्वतःहा स्वयम रोजगार चालवुन प्रतिकुल परिस्थितीत आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी महत्वाचे योगदान करत असल्याने तसेच  आपल्या कार्य शैलीतून, समाजाला आणि कुटुंबाला आदर्श संस्कार देण्याचे  कार्य करीत आहात म्हणूनच समाजातील चांद तडवी,अनिता आंबेकर,छाया चौधरी,पुजा पगारे, ॲड.प्रिया अडकमोल, वसंती सुरवाडे, सुरेखा बि-हाडे, अमिना मनकर, राजश्री नेवे, सुजाता सपकाळे, सुरेखा खरात  असे  ११ महिलांची निवड करून  महिलांना त्यांच्या कार्यात अधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी **स्त्री शक्ती सन्मान*२०२३ पुरस्कार*  देऊन  मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले. पुरस्कारार्थी महिला मनोगत व्यक्त करतांना चांद तडवी यांनी हा पुरस्कार मला मनोबळ वाढवणारा असुन समाजाने आम्हा तृतीयपंथींना स्विकारावे जेव्हा समाज स्वीकारतील तेव्हा आमचे आई वडील आम्हाला स्वीकारतील अशी भावना व्यक्त करून जन्माला आले पासुन तर मनापर्यंतचा प्रवास खुप खरतळ आहे मला हर ठिकाणी तिरस्काराला बळी पडावे लागले पण तरी न हारता मी समाज कार्य करते लोकांचे घरगुती वादविवाद मध्यस्थीने मिटविते त्याच बरोबर  संध्या पोलीस भर्तीची तयारी करत आहे आजचा हा पुरस्कार मला बळ देणारा असुन नेहमी फाउंडेशन चे आभारी राहिल अशी भावना व्यक्त केली.पुजा पगारे व अमिना मनकर यांनी हा आमचा पहिला असा पुरस्कार असेल ज्यामुळे आमचे पार्लर व्यवसाय साठी अजुन जिद्दीने काम पुढे नेवुन अधिक महिला अजुन कसे सक्षम करता येतील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहु तळागळातील वंचित घटकांना आपण समाजात मानसन्मानाने पुरस्कार  दिला यासाठी फाउंडेशन चे आभार मानले.ॲड.प्रिया अडकमोल यांनी मुलं आणि मुलींमध्ये कधीही भेदभाव करू नका ज्याप्रमाणे मुलगा प्रगती करतो त्याच्या दुप्पट प्रमाणे मुलगी ही प्रगती करत असते आणि ती एका घराला सुंदर बनवत नसते तर दोन घरांना घेऊन चालत असते घराला स्वर्ग बनवते अशी भावना व्यक्त केल्या व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले याकरिता फाउंडेशन चे आभार मानले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रकाश लोढते यांनी केले व आभार फाउंडेशन च्या सहसचिव शैला तायडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशन सचिव निर्मला सुरवाडे, सहसचिव शैला तायडे,दुर्गा सोनवणे, सुरेखा ठाकुर,ममता निकम यांनी केले..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.