सध्या मार्च महिना सुरू झाला असून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे परंतु भुसावळ बस स्थानकामध्ये प्रवाशांना उभे राहण्यासाठी पुरेसे शेड नाही या कारणाने प्रवासी उन्हातच उभे राहत असल्याचे धक्कादायक चित्र आहे .तसेच प्रवाशांना पिण्यासाठी पाण्याची सुविधा नसल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव पाण्याची बाटली विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे . राज्य शासन वेगवेगळ्या सवलती प्रवाशांसाठी जाहीर करत असले तरी प्रत्यक्षात प्रवाशांसाठी सुख सोयी जर मिळत नसेल तर प्रवाशांनी कोणाला जॉब विचारावा असा प्रश्न निर्माण झाला आहे .भुसावळ बस स्थानकात या दोन्ही समस्याचे निराकरण त्वरित करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे .