. . भर वस्तीत असलेल्या या राम मंदीरात आज भव्य दिव्य असा राम नवमी उत्सव होत असून सालाबादा प्रमाणे सर्व प्रकारची तयारी करण्यात आली आहे . या राम मंदिराला प्रसिद्ध लेखक साने गुरुजी यांनी सुद्धा भेट दिली आहे . इंग्रज काळापासून सदरचे मंदिर असून सागवानी लाकडांमध्ये तीन मजली असलेले एकमेव राम मंदिर आहे . या मंदीरात पूर्वीं शाळा भरविली जात होती . या ठिकाणी शिक्षण घेतलेल्या अनेक व्यक्ती चांगल्या पदावर कार्य करीत आहे .
या मंदिरात राम , लक्ष्मण , भरत , शत्रुध्न , सितामाई , हनुमान , याप्रमाणे एकूण दहा मूर्त्या असून मंदिराला चारी बाजूने वेगवेगळ्या पद्धतीचे बारीक नक्षीकाम केलेले आहे . या मंदिरामध्ये महात्मा गांधी काळाचा लाकडी चरखा असून चरखा पाहण्यासाठी जळगाव भुसावळ व वेगवेगळ्या गावाहून विद्यार्थी व इतर व्यक्ती येत असतात .सदर मंदिरात दररोज पूजा ,आरती व वेगवेगळ्या उत्सव सुद्धा साजरे केले जात असतात . परिसरात हे सर्वात जुने मंदिर असल्याचे बोलले जाते . या मंदिराची संस्था असुन मंदिरासाठी शासनाकडून आतापर्यंत कोणताही निधी उपलब्ध नसून सर्व काही सुविधा देणगीदाराकडून केलेल्या आहेत .
आज येथील राममंदीरात भव्य असे रामनवमीचे आयोजन असल्याचे व्यवस्थापक गोपाळ पाटील व उपसरपंच राजकुमार यांनी सांगितले .