Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


जळगांव जिल्हा क्रीडा शिक्षक पुरस्कारासाठी वरणगावच्या आशिष चौधरी सरांची निवड

जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रिडा शिक्षक महासंघांकडून दिल्या जाणाऱ्या आदर्श क्रिडा शिक्षक पुरस्कारात यावर्षी वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयाचे उत्कृष्ठ शिक्षक म्हणून क्रीडा क्षेत्रात नावलौकीक असलेले . बहुआयामी . व्यक्तीमत्व आशिष चौधरी सर यांनी २०२३ चा बहुमान प्राप्त झाला आहे. 
हा पुरस्कार ता. २६ रविवार  जाहीर करण्यात आला आहेत . शाळा, गाव, तालुका ते राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडू तयार करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. 
जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रिडा शिक्षक महासंघांकडून क्रीडा शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हाभरातून प्रस्ताव मागविण्यात येतात. त्यानंतर निवड समिती उत्तम काम करणाऱ्या शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करते.यावर्षी क्रीडा शिक्षक पुरस्कारासाठी वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयातील क्रिडा शिक्षक आशिष चौधरी सर  यांची निवड झाल्याचे जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रिडा शिक्षक महासंघांकडून जाहीर केले आहे.आशिष चौधरी सर यांनी त्यांच्या सेवाकार्यात  तालुका, जिल्हा , विभाग, राज्य , राष्ट्रीय हॅन्डरेसलींग खेळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार केले. खो- खो सारखे असे विशिष्ठ खेळामध्ये त्यांच्या खेळाडूने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून विद्यालयांसह गाव तालुका जिल्हा व राज्याचे नाव उज्वल केले आहे. खो-खो क्रिकेट, कबड्डी, ॲथलेटिक्स हॅन्डरेसलींग अशा विविध स्पर्धांमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळवले. यामध्ये आशिष चौधरी सरांचा  सिंहाचा वाटा आहे.पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत केवळ मैदानावर ठाण मांडून विद्यार्थी घडवणाऱ्या आशिश सरांना  पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल .दि. वरणगाव एज्युकेशन सोसायटि च्या अध्यक्षा वंदना पाटिल व सर्व सभासद सहकार क्षेत्रातील सहकारमित्र चंद्रकांत बढे सर , महात्मा गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना चव्हाण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह शिक्षण व क्रिडा, पत्रकार, राजकिय अशा विविध क्षेत्रातील नागरीकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


टिप्पण्या

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.