Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ तालुक्यातील वराडसीम ग्रामपंचायतचे दप्तर गेले चोरीला .



भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील ग्रामपंचायत चोरी झाली ही घटना 20 जानेवारी ते 23 जानेवारी 2023 या काळात घडली आहे याप्रकरणी तब्बल दोन महिन्यानंतर भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ग्रामपंचायतच्या कार्यालयात कपाटात ठेवलेले रजिस्टर दप्तर अशी सुमारे पाच हजार सातशे रुपये किमतीचे साहित्य चोरट्यांनी 20 जानेवारी ते 23 जानेवारी या काळात चोरून नेले 23 जानेवारीला सकाळी साडेनऊ वाजता चोरीची घटना उघडकीस आली आहे
ग्रामपंचायतच्या मागील दरवाजा अर्धवट उघडा होता तो ढकलून चोरट्यांनी आज प्रवेश करत ही चोरी केली जानेवारी महिन्यात घडलेल्या घटनेबाबत कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी झाली मात्र कुणी माहिती दिली नसल्याने ग्राम विकास अधिकारी गौतम वाढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास दीपक जाधव हे करीत आहेत
ग्रामपंचायत मधील दप्तर चोरीला गेल्याने याबद्दल उलट सुलट चर्चा सुद्धा सुरू आहे
दप्तर चोरीला जाणे म्हणजे यात काही अफरातफरीचा प्रकार तर नाही ना असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहे . पोलिसांनी याची कसून चौकशी करून या चोरीच्या घटनेचा मुख्य सूत्रधार शोधावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.