भाविकांची दिवसे दिवस येथे गर्दी वाढत आहे संस्थेनेही भरपूर सुविधा गेल्या पंधरा वर्षात केलेल्या आहेत . शासकिय योजनांचा लाभ आ . चंद्रकांत पाटील यांनी मिळवुन देण्याचा प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहे . .
या ठिकाणी दर शनिवारी लाखोच्या संख्येने भाविकांचे आगमन होत असते. या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक भाविकांची ग़ैरसोय होत असते. तरी या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्दाला धरून तसेच येथे ब वर्ग दर्जा प्राप्त व्हावा अशी मागणी जय श्री हनुमान मंदिर ट्रस्ट, शिरसाळे ता. बोदवड जि. जळगांव या ट्रस्ट चे अध्यक्ष , उपाध्यक्ष तसेच विश्वस्त व गावकऱ्यांनी केल्याने यासाठी या क्षेत्राचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या देवस्थान व तीर्थस्थळाचे दर्जा वाढ करून “ब”वर्गाचे देवस्थान व पर्यटन स्थळ बनविण्याकरिता पुढाकार घेवून प्रयत्न सुरु केलेले आहे .
याच प्रयत्नांना प्रचंड यश आलेले असून त्यांनी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून मागणी लावून धरली होती. या मागणीला यश आलेले असून त्यानुसार, जय श्री हनुमान मंदिर ट्रस्ट, शिरसाळे ता. बोदवड जि. जळगांव या तीर्थक्षेत्रांस “ब” वर्ग दर्जा प्रदान करण्यात आला असून यासंदर्भात महाराष्ट्र शासन,ग्राम विकास विभाग, शासन निर्णय २३ मार्च, २०२३. अन्वये परिपत्रक प्रसिद्ध झालेले आहे.