जामनेर तालुक्यातील गोद्री या गावी पाईपलाईनचे खोदकाम करीत असताना पार्वती देवीची मूर्ती म सापडली असल्याचे येथील पोलीस पाटलांनी सांगितले आहे . गोदरी हे गाव औरंगाबाद जळगाव या सीमेवर असून पूर्वीच्या काळी निजामशाहीच्या काळात या गावापर्यंत निजामशाहीचे सैनिक येत असल्याचे पूर्वजांनी सांगितल्याचे नागरीक सांगतात .
तसेच या ठिकाणी उभ्या असलेल्या महादेव मंदिराच्या खाली सुद्धा याच प्रकारे मुर्त्या सापडल्या होत्या . त्याच वेळेला हे मंदिर उभे करण्यात आलेले आहे . गोदरी या गावात अनेक ठिकाणी मंदिराची पडझड झाली असावी आणि या ठिकाणी पुरातन हेमाडपंथी मंदिर असल्याचे पुरावे प्रत्यक्षदर्शी दिसत असल्याने पुरातत्व खात्याने या गावाची माहीती काढुन या गावाचा इतिहास शोधून काढावा व येथे जमिनीत काही मंदिर ' लेणी वगैरे आहेत का ते शोधून काढावे . या गावी पुरातन मठ होता त्या मधुन भुयारी मार्ग होता उत्खनन केल्यास हे सर्व लक्षात येईल पुरातत्व खात्याने हे शोधून काढावे ही अपेक्षा वर्तविण्यात येत आहे .