जळगांव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अकलूज येथील शुभम सपकाळे यांच्या खून प्रकरणी कोळी समाजाने मंगळवारी आंदोलनाचा इशारा दिला होता .
या अनुषंगाने कोळी समाजाची भुसावळ येथे पत्रकार परिषद झाली असून यात आंदोलन स्थगित करण्याचे कोळी समाज अध्यक्ष जितेंद्र सपकाळे यांनी सांगितले आहे .
शुभमच्या घरी आमदार , व राजकीय नेते यांनी भेटी दिल्या आहेत .
शुभम सपकाळे या युवकाच्या खुनाने संपूर्ण जिल्हा हादरला असून यासाठी कोळी समाज मोठ्या आंदोलनाच्या तयारीत असताना पोलिसांनी योग्य दिशेने तपास करून तिघा आरोपींना अटक केली आहे . योग्य न्याय मिळण्यासाठी सदर गुन्ह्यांमध्ये तपासासाठी डीवायएसपी लेव्हलचा अधिकारी नेमावा व सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी ही मागणी आहे . व अकलूद मधील अतिक्रमण काढून गुंडेगिरी संपवावी ही मागणी समाज बांधव करीत आहेत .. याप्रसंगी कोळी समाजाचे जिल्हाभरातून नेते पत्रकार परिषद साठी उपस्थित होते .