जळगाव जिल्हा युवक काँग्रेस तसेच जळगाव जिल्हा एन एस यु आय यांच्या वतीने काँग्रेस नेते खा.राहुलजी गांधी यांच्या विरोधात केंद्र सरकार कडून सूडबुद्धिने अनैतिक पणे कारवाई करून सदस्यत्व दडपशाही कारभाराने रद्द केल्याप्रकरणी आज भुसावळ येथे #लोकशाही वाचविण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष प्रशांत भैय्या ओगले यांच्या नेतृत्वात निदर्शन करण्यात आले .
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष योगेंद्र पाटील ,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी आनंद पुरोहित , प्रदेश सरचिटणीस इम्रान खान, एन एस यु आय प्रदेश सरचिटणीस धनंजयदादा चौधरी , युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे , जळगाव शहराध्यक्ष मुजीब पटेल, एन एस यु आय जिल्हाध्यक्ष भूपेंद्र जाधव , अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष मुनाव्वर खान, भुसावळ युवक काँग्रेस अध्यक्ष तौफिक शेख , अमळनेर युवक काँग्रेस अध्यक्ष महेश दगडु पाटील आदी मान्यवरउपस्थित होते