Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


दिपनगर येथे वीज निर्मिती केंद्रात होत असलेल्या अवैध रेती पुरवठ्याची चौकशी करणे बाबत मुख्य अभियंता यांना वंचित महासंघाचे निवेदन





 दिपनगर येथे वीज निर्मिती केंद्रात होत असलेल्या अवैध रेती पुरवठ्या बाबत चौकशी करण्याची मागणी वंचित महासंघाने केली आहे . 
दीपनगर तालुका भुसावळ येथील वीज निर्मिती केंद्रात होत असलेल्या नवीन बांधकामाच्या कामी जी रेती पुरवली जाते ती अवैद्य रित्या पुरवली जात आहे शासनाची कोणतीही रॉयल्टी परमिट आणि इतर नियम धाब्यावर बसवून अधिकृतपणे व अवैध रीतीने होत असलेली रेतीपुरवठा याची सखोल चौकशी व्हावी तसेच प्रकल्पामध्ये सुरू असलेल्या कामामध्ये वाळु मिश्रीत रेतीचा होत असलेला वापर याची चौकशी करण्यात यावी आणि 660 प्रकल्पा मध्ये किमान वेतन अधिनियम 1948 मधील तरतुदीचे पालन व्हावे व निविदाधारकाकडुन नियमाप्रमाणे सुरक्षा  अनामत आयकर व अन्य कर वस्तु ,सेवाकर (GST) शासनाचे वेळोवेळी लावण्यात येणारे कर देयकातुन कपात करण्यात येत नाही याची चौकशी व्हावी तसेच यापूर्वी कार्यरत कामगारांना PF / ESIC / EPF / व तत्सम बाबी भरणा करत असल्यास निविदाधारकांनी अदा केलेल्या दरमहा भविष्य निर्वाह निधी भरल्याचे पावती सादर करणे बंधनकारक आहे याबाबत कार्यवाही होत नाही तरी चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन मा.विवेक रोकडे मुख्य अभियंता प्रकल्प 660 दिपनगर व स्थापत्य विभागाचे उपमुख्य अभियंता मनोहर तायडे साहेब यांच्याशी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे,जिल्हा महासचिव दिनेश इखारे,कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे,भुसावळ शहर महासचिव देवदत्त मकासरे मेजर यांनी चर्चा करून निवेदनाद्वारे मागणी केली व प्रशासनास सांगितले आपण गांभिर्याने दखल घेऊन उचित कार्यवाही करण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी 660 मेगावॅट प्रकल्पा समोर तिव्र स्वरुपाचे आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.