सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
दिनांक २९/३/२०२३ बुधवार रोजी सकाळी आठवाजेच्या सुमारास प्रातविधी साठी सुजित दिगंबर पाटील राहणार सारवे बुद्रुक ता पाचोरा नगरदेवळा हद्द हा सायंकाळ पर्यत आढळून आला नसल्या कारणाने गावातील नागरिकांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता कुठेही आढळुन आला नाही म्हणून तात्काळ या बाबत नगरदेवळा दुरक्षेत्र येथील विनोद पाटील मनोहर पाटील व निवृत्ती मोरे यांना या बाबत कळविण्यात आल्यावर त्यांनी तात्काळ सारवे गाव गाठले व गावकर्यांच्या साथीने शोध घेण्यास सुरुवात केली असता हिंगोने रस्त्यालगतच्या गट न 69 राजेंद्र पुंडलिक पाटील यांच्या मक्याच्या शेतात सुजित रात्री 10 वाजेच्या सुमारास मृतावस्थेत आढळुन आला व कुठल्यातरी जंगली जनावराच्या हल्यामुळेच हा मृत्यू झाल्या असल्याच्या दिसत असल्यामुळे नगरदेवळा दुरक्षेत्र च्या पोलिसांनी पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना या बाबत माहिती दिली त्या नंतर वनविभागाला रात्री अकरा वाजेच्या सुमारास माहिती देण्यात आली त्या नंतर लागलीच अर्षद मुलांनी वनक्षेत्रपाल पी बी देवरे मुकेश बोरसे प्रकाश सूर्यवंशी डी एस वानखेडे वाय एम साळुखे व सचिन कुमावत व जय मल्हार ambulans चे चालक अमोल पाटील हे घटनास्थळी दाखल झाले व जागेची पाहणी केली व शव शवविच्छेदनास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात पाठविले या बाबत आमचे प्रतिनिधी यांनी वनपाल अर्षद मुलानी यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला पुढील तपास सुरू आहे