जळगांव जिल्ह्यात पाळधी गावी तीन दिवसापूर्वी दगडफेकी चा प्रकार घडला होता त्यानंतर अमळनेर शहरात गुरुवार राम नवमी रोजी दोन गटात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचे रूपांतर रात्री दगडफेकीत झाले. रात्री १० च्या सुमारास शहरात ४ ठिकाणी दगडफेक करण्यात आली. पोलीसांना माहीती मिळताच पोलीस घटना स्थळी पोहचले यात दोन पोलिससुद्धा जखमी झाले असल्याचे वृत्त असुन पोलीसांनी परिस्थिती वर नियंत्रण मिळविले आहे .
शहरातील भोईवाडा, मण्यार मोहल्ला, कासार गल्ली, दारू मोहल्ला भागात दोन गटात दगडफेक झाली असून दोन्ही गटातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाहन केल्यावर तणावपूर्ण शांतता पसरली आहे
दगडफेक झालेल्या परिसरात तातडीने जिल्हा पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांनी माहीती जाणून घेतली . उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लागलीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले . व अनर्थ टळला असुन कोणत्याही अफवावर विश्वास ठेवु नये असे आवाहन पोलीस . विभागाकडून करण्यात आले आहे .