Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


50 ओके घेणाऱ्यांना मतदान वेळी त्यांची जागा दाखवा . आ . एकनाथ खडसे यांचे विल्हाळे येथे प्रतिपादन

प्रतिनिधी भुसावळ
शेतकऱ्यांचा , मजूरांचा व कामगारांच्या प्रश्नाची दखल न घेता 50 खोक्यावर विकल्या जाणाऱ्या आमदारांना मतदानाच्या वेळी त्यांची जागा दाखवा असे प्रतिपादन आमदार एकनाथराव खडसे यांनी केले .
ते भुसावळ तालुक्यातील विल्हाळे येथील भव्य नागरी सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी बोलत होते . विल्हाळा येथे ग्रामस्थांतर्फे आमदार एकनाथराव खडसे यांची विधान परिषदेच्या गट नेते पदी निवड झाल्याबद्दल तसेच लोकनेते प्रतिभा शिंदे यांनी राखेचा प्रश्न लावून धरल्याबद्दल व संतोषभाऊ चौधरी यांचा भव्य नागरी सत्कार ठेवण्यात आला होता . याप्रसंगी राष्ट्रवादीचे रवींद्र भैय्या पाटील ,जिल्हा परिषद सदस्य रवी नाना पाटील , राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी ,दीपक मराठे , सुधाकर जावळे , प्रकाश नारखेडे ,लोक संघर्ष पार्टीचे चंद्रकांत चौधरी ,आकाश कुरकुरे आदी उपस्थित होते .
 यावेळी मान्यवरांचा भव्य सत्कार करण्यात आला असून वेल्हाळे मधील राखेचा प्रश्न विधानसभेत एकनाथराव खडसे यांनी मार्गी लावला . त्यावेळी एकनाथराव खडसे यांनी सांगितले की पूर्ण विधानसभेत फक्त मीच शेतकऱ्यांचा कापसाचा प्रश्न लावून धरला वेळोवेळी शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे व कामगारांचे प्रश्न मी विधानसभेत मांडत राहील . मी संतोष भाऊ चौधरी ' रवींद्र भैया पाटील आम्ही सर्व मिळून एकत्रितपणे प्रचार करून सर्व संस्था व आमदार सुद्धा आपल्याच पक्षाचा आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे .यावेळी संतोष चौधरी यांनी सांगितले की कृषी उत्पन्न बाजार समितीत तसेच इतर सर्व संस्थांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारास भरभरून मतदान करावे . भुसावळ तालुक्यात कमीशन बेसिसवर निकृष्ठ कामे होत आहेत .प्रतिभा शिंदे यांनी दिपनगर प्रशासन राखेच्या बाबतीत योग्य निर्णय घेत नसल्याने मजुरावर उपासमारीची वेळ येऊ शकते असे सांगून आम्ही आंदोलनासाठी केव्हाही तयार असल्याचे त्यांनी सांगितले .
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय आर पाटील सर यांनी केले तर आभार नागो पाटील यांनी मानले . . कार्यक्रम यशस्वीतेसाठी विल्हाळे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.