Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


स्वातंत्र्य दिनी एक पेड मॉ के लिए संकल्प करा डॉ . सुरेंद्र सिंग पाटील .

*स्वातंत्र्यदिनी हर घर तिरंगा, हरित व प्रदूषण मुक्त भारत होण्यासाठी ॔॔॔एक पेड माँ के लिये॓॓॓॓ अभियानांतर्गत संगोपनासहित झाडे लावण्याचा संकल्प करूया. डॉ. सुरेंद्रसिंग पाटील*            15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन सगळीकडे हर घर तिरंगा अभियान सुरू असून स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपल्या स्वातंत्र्यवीर, स्वातंत्र्य सैनिक यांनी प्राणाची आहुती देत तसेच आपल्या जीवावर उदार होत आपणास स्वातंत्र्य मिळवून दिले. या सर्व स्वातंत्र्यवीरांना वंदन करत शत शत प्रणाम ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्या देशात हरित क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने देश प्रदूषणमुक्त होता ज्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्यासाठी लढले तसेच भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाचे तसेच आपल्या रक्षणासाठी आपल्या जीवावर उदार होत देशसेवा करत असलेले मिलिटरी,  पॅरामिलिटरी फोर्स. त्याप्रमाणे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हरित क्षेत्राचे रक्षण करणे तसेच त्यात होणारी कमी लगेच भरून काढणे ही आपली सामुदायिक जबाबदारी होती. परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष केल्याने आपल्या देशात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने हरित क्षेत्रात घट होत त्याचा पर्यावरणावर  विपरीत परिणाम होत प्रदूषण तसेच तापमान वाढत ढगफुटीसदृश्य पाऊस, चक्रीवादळे, भूकंप, अनेक प्रकारचे दुर्धर आजार अशा अनेक संकटांचा सामना करावा लागत असून आपल्यासहित निसर्गनिर्मित सर्व सजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हरित भारत, समृद्ध भारत, प्रदूषण मुक्त भारत होण्यासाठी हरित क्षेत्रात वाढ होण्याच्या दृष्टीने आदरणीय प्रधानमंत्री यांच्या ॔॔॔एक पेड माँ के नाम॓॓॓ या अभियानास प्रतिसाद देत आपल्या देशासाठी व स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांसाठी तसेच  आपल्या देशाच्या रक्षणासाठी देशसेवा करत असलेल्या सैनिकांप्रती  स्वातंत्र्य दिनी आपले आद्य कर्तव्य म्हणून घरातील प्रत्येक सदस्याने हर घर तिरंगा याचबरोबर या सुरू असलेल्या पावसाळ्यात झाडे लावून त्याचे संगोपन व संरक्षण करण्याचा संकल्प करत हरित भारत, समृद्ध भारत, प्रदूषणमुक्त भारत घडवण्यास आपला हातभार लावूया. डॉ. सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान प्रतिष्ठान

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.