जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सद्यस्थितीत भारतीय महिला आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारच्या खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत विजयी होत जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावत आहे. आपल्या येथे महिलांना अनेक सोयी सुविधा सरकार पुरवत त्यांचा उत्साह वाढवत असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिलांच्या विविध स्पर्धांमध्ये महिला सहभागी होत असून विजय प्राप्त करत भारताचे नाव उंचावत आहे . आपल्याकडे महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक सर्वे नंबर मध्ये ओपन स्पेस असून त्यातील बऱ्याच ठिकाणी व्यायामासाठी आवश्यक सामु ग्रीसह बगीच्याची निर्मिती होत आहे. तेथे सर्व स्त्री पुरुष लहान मुले मुली एकत्रित येत असतात त्यामुळे बऱ्याचशा मुलींना किंवा महिलांना व्यायाम तसेच सराव करण्यास संकोच वाटत असतो त्यामुळे प्रत्येक वार्डातील एक ओपन स्पेस फक्त महिलांसाठी आधुनिक सामुग्रीसह व्यायाम शाळा मैदानासह उपलब्ध केल्यास अनेक प्रकारचे महिला खेळाडू निर्माण होऊन आपला ठसा उमटवू शकतील. तसेच शहरी व ग्रामीण भागातील मुलींच्या शाळेमध्ये सुद्धा सुसज्ज व्यायाम शाळा उभारण्यास तसेच ग्रामीण भागात सुद्धा स्वतंत्र खेळाचे मैदान मुलींसाठी तसेच महिलांसाठी उपलब्ध करून दिल्यास प्रत्येक ठिकाणी अनेक महिला खेळाडू निर्माण होतील. तसेच शासकीय विभागात महिलांसाठी आरक्षित असलेल्या पोलीस, सैन्य, वनविभाग अशा अनेक विभागात जिथ शारीरिक चाचणी महत्त्वाची आहे अशा ठिकाणीही फायदा होऊ शकतो तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या प्रत्येक खेळामध्ये विजय प्राप्त करत भारताचे नाव उंचावून आपणास अनेक मेडल प्राप्त होतील.
डॉ.सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान