कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महोदया सौ. प्रतिभा संदीप चौधरी, सदस्या सौ.जयश्री अमित चौधरी, सौ. मोहिनी मोरेश्वर फिरके, सौ. सुवर्णा गिरीश चौधरी, सेक्रेटरी मा. श्री किशोर रवींद्रनाथ झोपे तसेच गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. एम आर चौधरी सर, सुशीला राम कदम प्राथमिक विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीता संजय चौधरी मॅडम तसेच पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा सौ.भारती महेश पाटील यांची सर्वांची उपस्थिती होती .
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेस हार अर्पण करून झाली. प्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती संगीता संजय चौधरी मॅडम यांनी प्रास्ताविक संभाषणामध्ये कार्य्रमाची रुपरेषा सांगितली. सूत्रसंचालन सौ. रेखा राम चौधरी मॅडम यांनी तर आभार श्री.विजयकुमार प्रभाकर झोपे सर यांनी मानले यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी खूप परिश्रम घेतले.