Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


घाटे विद्यालयात स्वच्छता व वृक्ष लागवड अभियान संपन्न

घाटे विद्यालयात स्वच्छता व वृक्ष लागवड अभियान
   तापी पूर्णा विद्या प्रसारक मंडळ संचलित घाटे ए. एस. विद्यालय व जुनियर कॉलेज उचंदे व सामाजिक वनीकरण विभाग व राष्ट्रीय हरित सेनेच्या अंतर्गत राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्ताने एक पेड मा के नाम व विद्यालय परिसर स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबवून विद्यालय परिसरात वृक्ष लागवड आणि परिसराचा ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करून शालेय परिसर स्वच्छ करण्यात आला राष्ट्रीय हरित सेना शिक्षक प्रशांतराज तायडे यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती देऊन स्वच्छतेचे मानवी जीवनावर होणारे सकारात्मक परिणाम त्यांच्या सभोवतालच्या परिसराच्या प्रसन्नतेवर होणारा प्रभाव याविषयी विद्यार्थ्यांना प्रबोधन करून स्वच्छता हे आपले मूलभूत कर्तव्य समजा असे सांगितले वनक्षेत्र अधिकारी अजय शिंदे यांनी वड पिंपळ,चिंच, कडुलिंब, या सह विविध औषधी वनस्पतींची माहिती देऊन वृक्ष संगोपन व वृक्ष लागवड हे आपले राष्ट्रीय कार्य समजून प्रत्येकाने यामध्ये सहभागी होण्याविषयी उपस्थितांना आवाहन केले. प्राचार्य सौ एस. व्ही.निळे मॅडम यांनी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे त्याचे भान प्रत्येक  वेळी ठेवून आपण कार्य केले पाहिजे असे सांगितले या कार्यक्रमाला वनक्षेत्र अधिकारी अजय शिंदे वनपाल विजय बोराडे सुनील पवार राम असुरे मयूर पाटील प्राचार्य एस व्ही निळे हरीत सेना शिक्षक प्रशांतराज तायडे सचिन पाटील, देवेंद्र हिवाळे, राहुल पाटील अमोल आव्हाड, उमेश पाटील, पी. ए. जोशी,रणजीत पाटील, सुनील महाजन, एम.एम. पावरा मॅडम व्ही.पी. तायडे मॅडम,  संगीता सेवलकर, व्ही एस सरोदे 
 शिक्षक व शिक्षकेतर बांधव यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मयुरेश बडगुजर यांनी करून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.