मनिषाताई संजय पाटील ज्ञानवंत समाज सेवक पुरस्काराने सन्मानित .
February 22, 2026
0
बहिणाई ब्रिगेडच्या भुसावळ शहराध्यक्ष. *सौ. मनीषाताई संजय पाटील यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दलराज्यस्तरीय ज्ञानवंत समाजसेवक पुरस्काराने* सन्मानित करण्यात आले आहे. सौ. जयश्रीताई महाजन,माजी महापौर,जळगाव शहर, यांचे शुभहस्ते तसेच मा. निळकंठ आप्पा गायकवाड माजी डायट प्राचार्य,आ. राजूमामा भोळे आमदार,जळगाव शहर, सौ. दीपमाला काळे नवनिर्वाचित महापौर,जळगाव शहर, सौ.गायत्रीताई भंगाळे,लोकनियुक्त नगराध्यक्षा, भुसावळ नगरपरिषद यांचे उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जनमत प्रतिष्ठान व मुक्ताई बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळा व बक्षीस वितरण समारंभ रविवार, दि.15 फेब्रुवारी 2026 अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,जळगाव येथे उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.