पाचोरा तहसील कार्यालयातील जवळपास सव्वा कोटी रुपये अनुदान घोटाळा उघडकीस आला होता याप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून पाचोरा तहसीलदार यांना आरोपी करून निलंबन व विभागीय चौकशी व्हावी या आशयाचे पत्र समाजसेवक निलेश नामदेव उभांळे यांनी महाराष्ट्र मुख्यमंत्री सचिवालय कक्षात दाखल केली होती, त्यांच्या या अर्जाची तात्काळ दखल मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडून घेण्यात आली आहे, प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जावर तातडीने कार्यवाही होऊन त्याबाबतचा आढावा मा. विभागीय आयुक्त यांचेकडुन घेण्यात येणार सल्याने सदरील अर्जावर शासन नियमानुसार विहित मुदतीत तात्काळ कार्यवाही करुन संबंधीत अर्जदार निलेश उभाळे यांना काय कारवाई केली याबाबत कळविण्यात यावे व केलेल्या कार्यवाही बाबतचा अहवाल मुख्यमंत्री सचिवालय या कार्यालयांस सादर करावा असे मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडून जळगाव जिल्हाधिकारी यांना आदेशित करण्यात आले आहे,
तर शेतकऱ्याच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या घोटाळ्या बाजांशि निगडित असलेला या उद्भवलेल्या प्रश्नावर व पाचोर्यातील घोटाळेबाजांवर जळगाव जिल्हाधिकारी काय कारवाई करतात काय कारवाई केली याचा अहवाल तक्रारदार निलेश उबाळे व मुख्यमंत्री सचिवालय कक्ष तसेच वरिष्ठांना कसा व कोणता सादर करतात याकडे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे,