Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


खंडवा रेल्वेलाईन साठी शेतकऱ्याच्या जमिनी संपादित न करता पुर्नसर्वेक्षण करण्याचे रेल्वे बोर्डाचे आदेश

केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांची रेल्वे बोर्डाचे चेअरमन श्री सतीश कुमारजी साहेब यांच्यासोबत रेल भवन दिल्ली येथे दिनांक ०४सप्टेंबर २०२५ रोजी भुसावळ ते खंडवा तिसरी व चौथी रेल्वे संपादनाबाबत गहू खेडा ते फेकरी २२की.मी. नवीन भूमी संपादित प्रस्तावित प्रकल्प या संदर्भात शेतकरी प्रतिनिधींसोबत बैठक संपन्न झाली .                            

भुसावळ ते खंडवा तिसरी व चौथी रेल्वे लाईन संपादनाची प्रक्रिया विस्तारित प्रकल्पाकरिता प्रस्तावित नवीन शेती शिवारात संपादनाची प्रक्रिया प्रांताधिकारी कार्यालयाकडून सुरू असून प्राथमिक अधिसूचना 20 A चे नोटिफिकेशन जारी करून भुसावळ तालुक्यातील निंभोरा बुद्रुक , साकरी ,मन्यारखेडा, जाडगाव ,फुलगाव, अंजन सोडा ,कठोरा बुद्रुक व रावेर तालुक्यातील गहूखेडा या नऊ गावांची जमीन संपादन प्रक्रिया सुरू असून या भागातील शेत जमीन आतापर्यंत रेल्वे लाईन करिता चौथ्यांदा संपादन होत आहे तसेच औष्णिकविद्युत प्रकल्प, ऑडनस फॅक्टरी वरणगाव, नॅशनल हायवे सहा, वेल्हाळे पाट ,हातनुर धरण, वेल्हाळे तलाव, ओझरखेडा धरण,   ओझरखेडापाईपलाईन, बीटीपीएस पाईपलाईन, अशा अनेक प्रकल्पांमध्ये या परिसरातील जमीन संपादन झालेली असून देशाच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या जमीन संपादनाबाबत मोठे योगदान आहे. 

    अनेक प्रकल्पांना जमीन संपादन झाल्यानंतर स्थानिकांना रोजगार सुद्धा मिळाला औद्योगिक विकासामुळे परिसरामधील शेतीचे मूल्य , जमिनीचे मूल्य मोठ्या प्रमाणात वाढलेलं असून रेल्वे संपादन प्रक्रिये करिता जमीन संपादन झाल्यानंतर जमिनीचे अवमूल्यन होते अशा परिस्थितीत उर्वरित शेतजमीन ही अत्यंत सुपीक असल्याकारणाने शेतकऱ्यांचे उपजिवीकेचे एकमेव साधन असल्याने संपादनानंतर जमिनीचे व शिवाराचे दोन तुकडे होऊन शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन शेतकरी बेरोजगार होत असल्याने शेतकऱ्यांचा भूमी संपादनास तीव्र विरोध आहे .
सदर संपादनात  68 +21 संपूर्ण 89 हेक्टर जमीन गहू खेड्यासहित संपादन होत असून एकूण 130 गट बाधित होत आहेत त्यात काही शेतकरी कायम भूमिहीन होणार आहेत सदर संपादनामध्ये 250 शेतकऱ्यांची जमीन संपादन होणार आहे .
     सर्व बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध बघता आणि भूमी संपादन न होण्यासाठी  वेळोवेळी  दिलेल्या निवेदनांचा विचार करून माननीय नामदार केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनसाठी माननीय नामदार केंद्रीय रेल्वेमंत्री श्री अश्विन वैष्णव साहेब यांचे सोबत चर्चा करून केंद्रीय रेल्वे बोर्ड दिल्ली चेअरमन , सीईओ श्री सतीश कुमार जी  साहेब यांचे सोबत शेतकरी प्रतिनिधी आणि एडवोकेट धीरेंद्र पी .देशमुख यांचे सोबत मीटिंग लावून सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांचे भविष्यातील कधीही भरून न निघणारे नुकसान याबाबत माहिती दिली आणि भुसावळ ते खंडवा तिसरी व चौथी रेल्वे लाईन संपादनासाठी पर्यायी मार्ग सुचविले ज्यामध्ये शेतकऱ्यांची कोणतीही जमीन संपादन होणार नाही आणि रेल्वेच्याच मालकीच्या जमिनीवर सदर प्रकल्प करण्यात येऊन मंत्री महोदयांनी पुनर र्सर्वेक्षणाचे आदेश दिले .
       सदर मिटींगला शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून श्री राजेंद्र साहेबराव चौधरी (माजी सभापती ),श्री प्राध्यापक के. पी .चौधरी सर (पर्यावरण तज्ञ अभ्यासक ), श्री शिवाजीराव राजाराम पाटील गहूखेडा (बीजेपी विधानसभा क्षेत्र प्रमुख मुक्ताईनगर )श्री राजकुमार भाऊ चौधरी (बीजेपी तालुका उपाध्यक्ष , माजी  सरपंच फुलगाव )श्री राहुल भाऊ प्रकाश पाटील असे शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते सर्व बाधित शेतकऱ्यांच्या वतीने श्री एडवोकेट धीरेंद्र प्रतापराव देशमुख यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.