मुक्ताईनगर तालुक्यातील शहर व ग्रामीण भागामधील अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर यांच्या कागदपत्रे पडताळणी करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकात्मिक बालविकास अधिकारी मुक्ताईनगर मिलिंद जगताप यांना सौ सुनिता पर्यवेक्षिका यांच्याकडून देण्यात आले .
इस सन 2008 पासून ते 2025 पर्यंत नोकर भरती मध्ये सेविका, मदतनिस आशावर्कर या जागा वशिल्याबाजीने कागदपत्रांमध्ये घोळ झालेला दिसून आलेला आहे शेतकरी,नोकरदार, धन पार्टीच्या महिलांना या भरतीमध्ये घेण्यात आलेला आहे गोरगरिबांच्या महिलांना वंचित करून आज त्यांना मजुरीसाठी दारोदार फिरावे लागत आहे हे निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकात्मिक बाल विकास कार्यालय मुक्ताईनगर येथे मनसे निवेदन देण्यात दिले या माध्यमातून मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व गावातील अंगणवाडी सेविका मदतनीस अशा वर्कर यांचे कागदपत्र पडताळणी अनिवार्य करणे ओरिजनल डुबलीकेट कागदपत्र या महिलांनी जमा केलेले आहेत . व त्याच्यावर नोकरी करत आहेत सदर बाब गांभीर्याची आहे .बालविकास अधिकारी साहेब यांनी लक्ष घालून पडताळणी करावी आणि कारवाई करावी आणि रिक्त जागेवर गरजू महिलांना घ्यावे असे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवेदनामध्ये म्हटले आहे .
चौकशी न झाल्यास मनसे आंदोलन करेल यावेळी मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भाऊ भोई , शहराध्यक्ष मंगेश कोळी , तालुका शेतकरी तालुका अध्यक्ष विनोद पाटील , जनता दल प्रहार दिव्यांग्याचे उपाध्यक्ष उत्तम जूबडे तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील , चैतन्य भोई निवेदन देतेवेळी उपस्थीत होते .