शिवरे दिगर, ता. पारोळा ..
सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
आशियाई विकास बँक योजना व सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. पारोळा ते कजगाव काँक्रिट रस्त्याचे काम आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने सुरू असून, त्याच निमित्ताने या शिबिराचे आयोजन अनुश्री ग्लोबल कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने श्री अनिल शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला ADB एन्व्हायरमेंटल ऑथॉरिटी इंजिनीअर - टीमचे केंद्रप्रमुख दादासाहेब नलुके सर, पावनरेखा मिश्रा, तसेच
सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर... श्री राऊत साहेब..डेप्युटी इंजिनियर श्री गणेश पाटील सर व इंजिनीयर अक्षय सावंत सर तसेच प्रकल्पाचे प्रोजेक्ट मॅनेजर - काशीनाथ बोरसे, प्रकल्पाशी संबंधित वरिष्ट समन्वयक, प्रकल्प केंद्र प्रमुख, व
डॉ. भूषण देवरे, अक्षय गव्हाणे, स्नेहा माळी, माधवी चौधरी, हर्षा चौधरी, किशोर भोई आणि जनरल मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अनेक दात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली.