Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


२४ सप्टेंबर पासुन एलिमेंटरी ड्राईंग परिक्षेचा प्रारंभ

२४ सप्टेंबर पासून एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा २०२५ .

डी. एस. देशमुख हायस्कूल, थोरगव्हाणचे १०५ विद्यार्थी सहभागी
सावदा (ता. रावेर) – येथील एस. ए. जी. हायस्कूल केंद्रावर येत्या २४ ते २७ सप्टेंबर २०२५ दरम्यान ड्रॉईंग ग्रेड परीक्षा पार पडणार आहे. या परीक्षेसाठी डी. एस. देशमुख हायस्कूल, थोरगव्हाण येथील १०५ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ही माहिती शाळेचे कलाशिक्षक श्री. एस. बी. सपकाळे यांनी दिली. कलाशिक्षक एस बी सपकाळे यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना १० वी ब वर्गात एकत्र करून अनुभवातून टीप्स दिल्या मार्गदर्शन केले .
 प्राथमिक (Elementary) परीक्षा
२४ सप्टेंबर २०२५
सकाळी १०.३० ते दुपारी १.०० – वस्तुचित्र (Object Drawing)
दुपारी २.०० ते ४.०० – स्मरणचित्र (Memory Drawing)
२५ सप्टेंबर २०२५
सकाळी १०.३० ते दुपारी १.०० – रचना (Design)
दुपारी २.०० ते ४.०० – भूमिती (Geometry)
 माध्यमिक (Intermediate) परीक्षा
२६ सप्टेंबर २०२५
सकाळी १०.३० ते दुपारी १.३० – स्टिल लाईफ (Still Life)
दुपारी २.३० ते ४.३० – स्मरणचित्र (Memory)
२७ सप्टेंबर २०२५
सकाळी १०.३० ते दुपारी १.३० – रचना (Design)
दुपारी २.३० ते ५.३० – भूमिती (Geometry)
विद्यार्थ्यांनी मनापासून तयारी करून या परीक्षेत यश संपादन करावे, असे आवाहन मुख्याध्यापक श्री. डी. के. पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.