Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


थोरगव्हाण हायस्कूल मध्ये विनोबा भावे जयंती साजरी

आचार्य विनोबा भावे जयंती डी. एस. देशमुख हायस्कूलात साजरी

थोरगव्हाण येथील डी. एस. देशमुख हायस्कूलात आचार्य विनोबा भावे यांची जयंती ११ सप्टेंबर रोजी ११ .०० वाजता परीपाठाच्या वेळी उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी. के. पाटील यांनी विनोबाजींच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी विनोबाजींनी लिहिलेल्या गीताई या पुस्तकाचे महत्त्व स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे शुभ हस्ते वाढदिवस असलेल्या कु. प्राची किशोर तायडे (इ. १० वी ब) हिला विनोबा भावे लिखित गीताई पुस्तक व पेन भेट देण्यात आले.

यावेळी वाय. जे. कुरकुरे यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांनी विशेषतः भूदान चळवळीचे महत्त्व समजावून सांगितले. भावे यांनी देशभरातील भूमिहीन शेतकऱ्यांसाठी स्वेच्छेने जमीनदान मिळवून दिल्याचे कार्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल, असे त्यांनी नमूद केले. तसेच सर्वोदय चळवळीतून समाजातील सर्व घटकांचा विकास, अहिंसा व समता यांचा संदेश देऊन विनोबाजींनी राष्ट्रजीवनात केलेले योगदानही त्यांनी उलगडून दाखवले.

या वेळी जेष्ठ शिक्षक टी. पी. घुले, क्रीडा शिक्षक जे. ए. चौधरी यांच्यासह सर्व शिक्षक बंधुभगिनी व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.