Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


निष्पाप मुलीच्या न्यायासाठी वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव हरेश्वर येथे मोर्चा

*"निष्पाप मुलीच्या न्यायासाठी समाज एकवटला. पिंपळगाव हरेश्वरचा भव्य मूक मोर्चा, मा. वैशालीताई सुर्यवंशी यांची उपस्थिती

पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन निष्पाप मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेविरोधात आज भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या विकृत लव्ह जिहादच्या कटाचा निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या या मूक मोर्चात सर्व समाजघटकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
या मूक मोर्चात मा. वैशालीताई सुर्यवंशी यांची विशेष उपस्थिती होती. या प्रसंगी समाजातील विविध स्तरांतील व नेत्यांनी ठाम भूमिका मांडली. उत्तमरावजी थोरात, भिका भाऊ इंदरकर (वि.हि.प. सहमंत्री), अतुलजी पाटील (बजरंग दल जिल्हा संयोजक), हेमंत गुरव, नाना बडगुजर (किसान महासंघ), संतोषजी गोरे (धर्मजागरण), विकासजी लोहार यांचीही उल्लेखनीय उपस्थिती होती.
“मुलींच्या अस्मितेचे रक्षण करणे ही आजच्या काळाची अत्यावश्यक गरज आहे. समाजाची एकजूट हाच या विकृत प्रवृत्तींच्या उच्चाटनाचा खरा मार्ग आहे,” असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या मूक मोर्चात शाळेचे विद्यार्थी, त्यांचे पालक, शेकडो महिला, युवक, शेतकरी, व्यावसायिक, कामगार यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून निष्पाप मुलीच्या न्यायासाठी ठाम आवाज बुलंद केला. संताप, दुःख आणि निर्धार या भावनांनी भारलेल्या वातावरणात मूक मोर्चाची सांगता झाली.
त्यानंतर पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.