Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


थोरगव्हाण येथील देशमुख विद्यालय मध्ये अपूर्व विज्ञान मेळावा संपन्न

अपूर्व विज्ञान मेळावा - विज्ञानातील सर्जनशीलतेचा उत्सव .

डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण येथे पारंपरिक पद्धतीला छेद देणारा आणि विद्यार्थ्यांच्या विज्ञानातील गोडी व सर्जनशीलतेला चालना देणारा 'अपूर्व विज्ञान मेळावा'  उत्साहात पार पडणार आहे. या उपक्रमाची पूर्वतयारी म्हणून दिनांक २ ऑगस्ट रोजी शाळेचे विज्ञान शिक्षक  के. पी. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या मार्गदर्शनात त्यांनी अपूर्व मेळावा 'स्वरूप, हेतु, वैज्ञानिक संकल्पना व कार्यकारणभाव' या वैज्ञानिक पद्धतीच्या मूलतत्त्वांची ओळख करून दिली. वैज्ञानिक संकल्पना अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंमधून वैज्ञानिक उपकरणे तयार करावीत, असे आवाहन त्यांनी केले.

शाळेचे मुख्याध्यापक मा. डी. के. पाटील यांनी या विज्ञान मेळाव्याचे आयोजन लवकरच करण्यात येईल, असे सांगून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले.

या मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे, एक मुलगा व एक मुलगी या दोघांनाही स्वतंत्रपणे उत्कृष्ट उपकरण सादरीकरणासाठी कै. पुंडलिक आनंदा चौधरी यांच्या स्मरणार्थ किरण चौधरी यांच्यातर्फे पाच हजार रुपयांच्या ठेवीवरील व्याज पारितोषिक दिले जाणार आहे.

हा ‘अपूर्व विज्ञान मेळावा’ या वर्षांपासून डी. एस. देशमुख विद्यालयात सातत्याने राबवण्यात येणार असून, तो विद्यार्थ्यांच्या विज्ञानाभिमुख विचारसरणीला व नवोपक्रमशीलतेला बळकटी देणारा एक उपक्रम ठरला आहे.
विज्ञान समिती के पी चौधरी , पी सी कचरे ' एन वी चौधरी , एस पी पाटील , सौ योगिता संजय झोपे सर्व विज्ञान शिक्षक विज्ञानातील छोटे छोटे प्रयोग कसे सादर करावे बाबत सखोल मार्गदर्शन करत आहे .
या प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधव विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.