Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


विवरे येथील बेंडाळे हायस्कूल मध्ये स्काउट गाईड नोंदणी व उजळणी वर्ग संपन्न

बेंडाळे हायस्कुल विवरा येथे तालुकास्तरीय स्काऊट गाईड नोंदणी व उजळणी वर्ग संपन्न

जळगाव भारत स्काऊट गाईड जिल्हा संस्था मार्फत रावेर तालुका युनिट नोंदणी व उजळणी वर्गाचे आयोजन श्री.ग.गो.बेंडाळे हायस्कूल,विवरे येथे करण्यात आले. 
सन 1907 स्काऊट चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल यांनी ब्राऊनसी बेटावर पहिले  स्काऊट शिबिर भरवले त्या घटनेची आठवण म्हणून दि.1 ऑगस्ट 2025 *"स्कार्फ डे"* साजरा केला जातो.स्काऊट गाईडचे जनक,संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाला शाळेचे मुख्याध्यापक मा.पी.एच.वायकोळे यांनी अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
सदर कार्यक्रमाप्रसंगी स्काऊट मास्टर अर्जुन सोळुंके (कलाशिक्षक) यांनी जगभरातील स्काउट्स आणि गाईड्स आपला ओळख चिन्ह असलेला स्कार्फ,काउंटिंग मधील एक महत्त्वाचे प्रतीक आहे. जे शिस्त,सेवा,एकता आणि बांधिलकीचे प्रतीक मानले जाते. स्कार्फ डे चे महत्व सांगितले. तालुकाभरातून आलेले स्काऊट मास्टर व गाईड कॅप्टन यांनी उजळणी वर्गात सहभाग घेतला आणि विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेतली. ज्या शाळांतील स्काऊट गाईड यांची नोंदणी अजून बाकी असेल त्यांनी त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन मा.कविता पाटील जळगाव जिल्हा भारत स्काऊट गाईड यांनी केले.
सन 2025 26 या शैक्षणिक वर्षात राबवावयाची माहिती देण्यात आली.
   या वेळी कविता पाटील,प्रणव गंगाखेडकर, पर्यवेक्षक आर.टी.कोल्हे,पी.पी.मिसर तसेच तालुक्यातील स्काऊट मास्टर व गाईड कॅप्टन उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.