सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
चोपडा तालुक्यातील अडावद आरोग्य केंद्रातील वडगाव बु उपकेंद्रात कार्यरत असलेले आरोग्य सेवक- विजय योगराज देशमुख यांची पदोन्नतीने त्यांची यावल तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र- पाडळसे येथे झाली आरोग्य सहाय्यक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ते गेल्या बऱ्याच वर्षा पासून अडावद तथा परिसरात विजय देशमुख यांनी आपल्या कामाच्या तथा स्वभावाच्या जोरावर स्वतःची आगळी वेगळी ओळख निर्माण केली होती, त्यांची काम करण्याची हातोटी व त्यांचा गोड-मृदु स्वभाव यामुळे त्यांना सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, अनेक क्षेत्रात आपले नाव लौकिक केले आहे,कोरोना असो किंवा कोणत्याही साथीची परिस्थितीत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्याला सडेतोड तोंड देत आपले कर्तव्य जबाबदारी पार पाडले आहे,
त्यांच्या पदोन्नतीने अडावद तथा परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे