स्वामी रमेशानंद
चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नववर्ष प्रारंभ होते. त्यानिमित्ताने भुसावळ शहरातील प्राचीन श्रीराम मंदिर, सराफ बाजार या ठिकाणी रामनवमी पर्यंत दररोज सायंकाळी ५ते६:३० या वेळेत संत एकनाथ रचित," भावार्थ रामायण "यावर प्रवचन मालिकेचे आयोजन मंदिर समिती द्वारे करण्यात आले आहे.
त्यात प्रवचन करतांना रमेशानंद म्हणाले की, रामकथा ही प्रत्येक मनुष्याला परमार्थाकडे घेऊन जाणारी व मनुष्य जन्माचे अंतिम लक्ष्य म्हणजेच मोक्ष प्राप्त करून देणारी पावनदायी कथा आहे. ही अमरकथा आहे. संत एकनाथांनी वाल्मीकि रामायाणातून मराठी भाषेत हे भावार्थ रामायण सांगितले आहे.
प्रभू श्रीरामाचे संपूर्ण जीवन चरित्र हे मनुष्यासाठी आचरणाचा आदर्श आहे. यातील संदेशानुसार जीवनात वागल्यास मनुष्य व समस्त प्राणिमात्रांचे निश्चित कल्याण होईल ,हा भावार्थ एकनाथ महाराजांनी आपल्या समोर ठेवला आहे.असे विचार मांडले.
या उत्सवात दररोज सकाळी ६ते९, पूजा ,अर्चन , अभिषेक होईल. दुपारी २:३० ते ४:३० विविध भजनी मंडळाचे भजन गायन होईल. त्यात प. पू .प्रल्हाद महाराज उपासना,यांचे , श्रीमती माई आठवले भजनी मंडळ, राजगोंड भजनी मंडळ, श्रीराम भजनी मंडळ ,यांचे भजन , मंगलमूर्ती भजनी मंडळ, लक्ष्मी भजनी मंडळ, त्रिपदी परिवाराचे भक्तिगीते, आदि कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आलेले आहे.
या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्षा सरिता चौक, राधेश्याम लाहोटी, जे बी. कोटेचा, राष्ट्र सेविका समितीच्या श्रीमती कल्याणी ओक ,सौ. जोशी आदींनी केले आहे.